भारतीय जनता पार्टी युवामोर्चा पनवेलतर्फे दरवर्षी गणेशोत्वाच्या काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास भारतीय जनता पार्टी पनवेल मंडळ कार्यालय एमटीएनएल रोड पनवेल येथे गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी आकर्षक अशी सजावट केली होती. यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले.