मेहकर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा माफियांवर कारवाई करत चांगलेच कंबरडे मोडले त्यामुळे त्यांच्यावर शाबासकीची थाप पोलीस प्रशासन व जनतेतून मिळत ही कारवाई दिनांक 21/08/2025 रोजी पहाटे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, समृद्धी महामार्गावरुन एका आयशर वाहनातुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची (गुटखा) वाहतुक होत आहे.यावरून गोपनीय पथकाच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.