जालना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4.30 वाजेपासून जालना शहराच्या विविध भागातून पोलीसांनी पथसंचलन केले. यावेळी सुमारे 370 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सण-उत्सव सुरु असतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून बारीक हालचालीवर लक्ष आहे. शिवाय वेळेत पोलीस मदत मिळाली पाहिजे यासाठी पोलीसांनी योग्य नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपविभाग पोलीसाकडून रुट मार्च काढला होता.