Download Now Banner

This browser does not support the video element.

बार्शी: घाणेगावात अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Barshi, Solapur | Aug 26, 2025
बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथे महसूल विभागाने अवैध मुरूम वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना व बिगर रॉयल्टीचा मुरूम वाहतूक करताना पकडण्यात आला. या कारवाईत सुमारे ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, टिपर चालक आणि मालकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी १ च्या सुमारास करण्यात आली आहे. प्रकरणी टिपरचालक मयूर सतीश भालशंकर (वय २५, रा. वैराग) आणि गाडी मालक आनंद सुरेश गुंड यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us