बोईसर- वंजारवाडा परिसरात ROB/RUB संदर्भात उच्चस्तरीय बैठक पालकमंत्री, बांधकाम विभाग सेक्रेटरी, डीएफसीसीचे वरिष्ठ अधिकारी, एमआरवीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि बोईसर- वंजारवाडा परिसरातील नागरिक शिष्टमंडळ यांच्या समवेत घेण्यात येणार आहे. ROB/RUB विषयी असलेले विविध प्रश्न, मागण्या यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी दिली आहे.