जळगाव तालुक्यातील खेडी येथे राहणाऱ्या तरूणाने राहत्या घराच्या वरच्य मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.