समुद्रपूर:तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा कहर शनिवारी दिवसभर सुध्दा कायम राहिला असुन वडगाव सावंगी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने लोखंडी येथे दर्शनासाठी गेलेले काही भाविक व समुद्रपुर येथे शाळेत गेलेले काही शाळकरी विद्यार्थी पुरामुळे अडकले होते.याची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून दोराच्या सहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.