शरद पवार गटाच्या जळगाव जि. प. माजी सदस्य संभाजी पाटील, डी. पी. साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तसेच वसई येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह 'बविआ'च्या अनेक कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. स्नेहा दुबे पंडीत, आ. राजेश वानखेडे उपस्थित होते.