तुमसर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राईस मिल सोसायटीचे अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे, तसेच नकडोंगरी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय गोपाले, अनंत गोपाले आणि कार्तिक देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. अपक्ष प्रवेश 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी भंडारा जिल्ह्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व पक्षाच्या धोरणांनी प्रभावित होऊन हा प्रवेश करण्यात आला असल्याचे नव्या कार्यकर्त्यांनी सांगितले.