पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत गरबा खेळत असलेल्या दोन चार वर्षीय मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाजूला बोलवून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव बंडू शिर्के वय 68 वर्ष असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या अपार्टमेंट खाली नराधमाने हे कृत्य केले तेथे तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो.