शहरातील केटीएस दवाखाना परिसरात करण रमेश गायधने (१९, रा.मुंडीपार-एमआयडीसी) यांनी उभी केलेली त्यांची ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एमएच-३५ एसी-४०३२ अज्ञात चोरट्याने २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान लंपास केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी सोमवारी (दि.८) भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार चव्हाण करीत आहेत.