बार्शी तालुक्यात अलिपूर परिसरात एका रिक्षा चालकाने राहत्या घरी साडीने स्लॅबच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र दिगंबर कोकाटे (वय ५५, रा. अलिपूर, ता बार्शी, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद बार्शी तालुका पोलिसात झाली असून तपास सुरू आहे.