सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांनी 13 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून एमडी मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांनी दिली आहे.