आज दि दोन स्पटेंबर रोजी सांयकाळी सहा वाजता माहिती मिळाली की मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर कन्नड तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधवांनी मुंबईतील आझाद मैदानावर हजेरी लावून जल्लोष साजरा केला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी हे बांधव गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपस्थित होते.अनेकांनी फेसबुक लाईव्ह करून आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच आंदोलनादरम्यानच्या व्यथा आणि अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले.