धुळे शहरातील मिल्लत नगर प्रभाग १९, १३, १४ व १५ मध्ये वीज वितरण कंपनीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व आझाद हिंद संघटनेतर्फे मोठे आंदोलन झाले. माजी आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कंपनी पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला. संतापाच्या भरात रफिक शाह पठाण यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. शेकडो नागरिकांनी घोषणाबाजी करून तीव्र रोष व्यक्त केला.