गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांची सदनिका विक्रीच्या नावाखाली १ कोटी ८४ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १० जून २०२१ ते २३ जून २०२३ या कालावधीत अरुण्या सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बी विंग, माळीनगर, देहूरोड येथे घडली आहे. या प्रकरणी अक्षय जगन्नाथ यादव (२८, माळीनगर, देहूरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.