हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी आज गुरुवार दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाज बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. श्रीकांत राठोड व हरीश राठोड हे दोघे बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी अमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी प्रलंबित आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख असूनही शासनाने दुर्लक्ष केले.