चाळीसगाव: धुळे-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर चाळीसगावजवळ विट भट्टीजवळ झालेल्या भीषण अपघातात इको (Eeco) कार आणि आयशर (Eicher) ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण आठ (८) जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी परदेशी हॉस्पिटल, चाळीसगाव येथे दाखल करण्यात आले आहे.