उदगीर शहरातील नळेगावं रोड येथे अंधारात दबा धरून बसलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेवून ४ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, ४ सप्टेंबर रोजी रात्री नळेगाव रोड हमालवाडी रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती अंधारात आपले अस्तित्व लपवून काहीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेला पोलिसांना आढळून आला,याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश भानुदास पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी महमद अहमद शबीर राहणार परभणी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे