*कळंब तालुक्यातील शेतीपिकाच्या नुकसानीची आ. राणा पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी* धाराशिव जिल्ह्यात संततधार झालेल्या पावसाने हिरवीगार शेतं पाण्याखाली गेल्याने बळीराजाच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं होत. याबाबत सोमवार दिनांक 25 रोजी आ. राणा पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, चिंता आणि नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या श्रमांचं फळ वाया जाऊ नये यासाठी शासनाच्या पातळीवर तातडीने मदत पोहचविण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली .