ोलिस कर्मचाऱ्याचा भरधाव कारवरून नियंत्रण सुटल्याने कारची रस्ता दुभाजकाला धडक बसून अपघात झाल्याची घटना मंगळवार ९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक थोडक्यात बचावला असला तरी दुभाजकावरील ५ बॅरीगेट तुटून नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, कुठलीही कारवाई न करता पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त कार इतरत्र हलविल्याने पोलीस प्रशासनाकडून सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर नाही. अशी शंका व्यक्त केली जात आहे.