नेर शहरातील अशोक नगर परिसरातील गोपालकृष्ण श्री संत नगाजी महाराज मंदिर व सांस्कृतिक सभागृह येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा 7 ऑक्टोबर पासून 8 ऑक्टोबर पर्यंत या दोन दिवसात पार पडला.यावेळी या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यात ह भ प राजकुमार साखरकर महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले.या सोहळ्याला नेर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष पवन भाऊ जयस्वाल यांच्यासह नेर शहर व नेर ग्रामीण सर्व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.