भुसावळ शहरात दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र मंगलमय वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात आली. सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात गणेशभक्तांनी बाप्पाचे स्वागत केले. घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांत आकर्षक मंडप उभारत गणेश मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत दिवसभर गर्दी दिसून आली. फुलं, सजावटीच्या वस्तू व मिठाई विक्रीत चांगली उलाढाल झाली.