जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने डी मार्ट परिसरातून गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अटक केली आहे. मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असलेला विनेश चंपालाल बरडे (वय ३०) हा संशयित आरोपी सध्या कुसुंबा येथे राहत होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे.