रत्नागिरी तालुक्यातील आगवे येथील बीएसएनएल टॉवरचे तब्बल 35 हजारांचे 902 किलो वजनाचे लोखंडी अँगल व प्लेटस अज्ञाताने चोरुन नेले. ही घटना सोमवार 28 जुलै ते मंगळवार 29 जुलै रोजी दुपारी 12 वा. कालावधीत घडली आहे. याबाबत नवाजिश फरमद अली (35, मुळ रा.चंदौरा सिवल मेरठ उत्तरप्रदेश सध्या रा.जाकादेवी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.