संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य शिवारात 21 ऑगस्ट रोजी विजेच्या लोमकळलेल्या जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला सुलोचना गजानन कारोळे असे मृतक महिलेचे नाव असून सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून तामगाव पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केली ची माहिती 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.