महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कामाची प्रशंसा केलेला व्हिडिओ सध्या राधानगरी मतदारसंघात आज दि. 24 रोजी मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गारगोटीत आले होते त्यावेळी जाहीर सभेत कार्यकर्त्यांनी आबिटकर साहेबांना मंत्री करा अशी मागणी केली होती. त्यावेळी शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले होते की प्रकाश आबिटकर यांना भरगोस मतांनी निवडून द्या त्यांना मंत्री करण्याचे काम माझे या दिलेल्या शब्दाला जागणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ आज मात्र मोबाईलवर सर्वत्र व्हायलर होत आहे.