सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अमोना येथे 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची आमदार मनोज कायंदे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.