बुलढाणा जिल्ह्यातील वझर येथे ६ सप्टेंबर रोजी पवन गणेश मोहीते वय २१ वर्षे हा गणपती विसर्जन करण्या करिता गणेश मुर्ती ला पाण्यामध्ये घेवुन जावुन विसर्जन करण्याकरिता गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पाण्यात पोहता येत नसल्याने तो खोल पाण्यात बुडून मरण पावला. गावातील लोकांचे व NDRF चे टीमच्या मदतीने पाण्याचे बाहेर काढले याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केली आहे.