अवैधरित्या देशी दारूची साठेबाजी करून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी दारूचा साठा पकडल्याची घटना घडली. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास खराशी येथे घडली. या घटनेत पालांदूर पोलिसांनी खराशी येथील मंगेश बाबुराव कहालकर (३३) यांच्या विरोधात पालांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पालांदूर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातुन ९० मिली देशी दारू ने भरलेल्या २० नग काचेचे पव्वे जप्त केले आहेत.