पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षातून प्रवास करीत असताना एका सिक्युरीटी गार्डला रिक्षाचालकासह 4 जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मिसळ हॉटेल समोर रविवारी (ता. 7) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत सिक्युरीटी गार्ड जखमी झाला आहे.