इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी योजनेतून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी पीएम यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक धनराज सहारे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कार्यालय नागपूर येथे संपर्क साधण्याचे आव्हान देखील त्यांनी केले आहे