सेलू.....वडिलोपार्जित शेतीच्या कारणावरून काकाला पुतण्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील रिधोरा येथे ता. 4 ला रात्री 9.30 वाजता घडली. या प्रकरणी रविंद्र हरिप्रसाद कंगाले वय 35 वर्ष यांच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी अंबादास रामदास कंगाले रा. रिधोरा याच्याविरुद्ध ता. 5 सप्टेंबरला सकाळी 12.15 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.