विविध प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून (२७ मे) बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. या संपामुळे अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील भूमी अभिलेख विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. या संपाला विदर्भभरातून पाठिंबा मिळाल्याने शासकीय कार्यालयांत शुकशुकाट निर्माण झाले आहे. यापूर्वी २३ मेपर्यंत कर्मचारी काळी फित लावून काम करत होते, मात्र मागण्या न मान्य झाल्यामुळे आता बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे सुधारित वेतनश्रेणी लागू कर