वसंत टॉकीज मार्गावरील बालाजी मंदिर येथे विविध धार्मिक उपक्रम होत असून आजूबाजूच्या परिसरात लोक वसाहती व मार्केट दुकाने आहेत. तसेच हा पोच रस्ता दोन रस्त्यांना जोडणारा आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुर्लक्षित व नादुरुस्त असल्याने स्थानिक भागात समस्या निर्माण झाली होती. अशातच आता आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या पुढाकाराने रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.