मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय (जीआर) तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी ओबीसी समाजाने जोरदार आंदोलन केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधवांनी गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले.