लहुजी शक्ती सेनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी मातंग कार्यकर्ता संवाद मेळाव्याला आज सोमवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून मातंग समाज बांधवांशी संवाद साधला. याप्रसंगी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लहुजी सेनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असून त्याची औपचारिक घोषणा या मेळाव्याद्वारे करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.