लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी कारवाई केली आहे. संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून आर्थिक व्यवहारातील प्रकरणात तपासादरम्यान लाच मागितली होती.शकील मोहम्मद शेख (४५) असे अटक केलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.