शासन नियमानुसार सर्व नोंदणीकृत वाहनावर येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यलय बुलढाणा अंतर्गत 2 लाख 90 हजार 291 वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बाकी आहे.या वाहन धारकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट लावून घ्यावे,असे आवाहन बुलढाणा आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यलय तर्फे मोटर वाहन निरीक्षक विवेक भंडारी यांनी आज 3 सप्टेंबर रोजी दुपारी केले आहे.