कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. 5 मध्ये आज 51.57 लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज १८ सप्टेंबर रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.या सर्व कामांमुळे प्रभागातील नागरी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.