घोटी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांनी मोठा यश मिळवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सागर मोहन माळी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह मोटारसायकल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक करून एकूण ८ मोटारसायकली (किंमत सुमारे ₹4.27 लाख) हस्तगत केल्या. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.