आरमोरी तालुक्याच्या पळसगाव परिसरात मागील दोन दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाचा संचार आहे. ह्या हत्तींकडून धानपिकाची नासधूस केली जात आहे.सध्या धानाचे पीक जोमात वाढलेले आहे. अशातच हिरवी लुसलुशीत पाती हत्ती फस्त करीत आहेत. रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास हत्ती शेतात प्रवेश करून मध्यरात्रीपर्यंत धान फस्त करतात.