इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर ४ महिने फोनवर बोलणे झाले. त्यानंतर एका ३१ वर्षीय पोलिसाने २५ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी संबंधित पोलिसावर चाकण पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.दत्ता भाऊराव कुंभारगावे असे आरोपीचे नाव आहे.