बंजारा समाजाच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी बंजारा समाजाचे शिष्टमंडळाच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोठ्या संख्येने पालघरमधील बंजारा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले.