आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनी या नव्याने स्थापन होत असलेल्या शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक पनवेल येथे झाली. त्यामध्ये उरण पनवेल कर्जत पाली सुधागड रोहा चे सभासद उपस्थित होते. 14 तारखेला पेण येथे 11.00 वाजता सर्व तालुक्यातील कृषिनिष्ट शेतकऱ्यांची सभा होणार आहे. तरी 15 तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांनी जमायचं ठरलं आहे. तत्पूर्वी उर्वरित महाड, पोलादपूर, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड यांची सभा माणगाव येथे घेण्याचे ठरले आहे.