वसई विरार पोलिसांच्या ताफ्यात पुण्याचा तपास करण्यासाठी पोलीस तपासात उपयुक्त अशी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. फॉरेन्सिक तपासासाठी यापूर्वी व्हॅन मुंबईवरून मागवावी लागत होती. गंभीर गुन्ह्यांच्या ठिकाणी तात्काळ ही व्हॅन पोहोचून पुरावे गोळा करण्यास मदत होणार आहे. या व्हॅनमध्ये डीएनए किट, सायंटिफिक उपकरणे, इतर साहित्य व सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल फॉरेन्सिक यांचा गुन्ह्याच्या तपासासाठी मोठा फायदा होणार आहे.