मुरादपूर येथे जुन्या भांडणावरुन मायलेकीला काठीने मारहाण एकमेकांच्या घरा शेजारी राहणाऱ्या दोन परिवारामध्ये शुल्लक कारणावरून नेहमी वाद होत असे. अशाच जुन्या भांडणावरून वाद झाला. यामध्ये आरोपींनी बांबूच्या काठीने माय लेकीला मारहाण केली. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी पती-पत्नी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना मुरादपूर येथे ८ सप्टेबर रोजी घडली. मुरादपूर येथील रहिवाशी असलेल्या मीरा भगवान गाडेकर वय ३५ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.