नियमांचे उल्लंघन करून विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवणार्या डिजेवर दि. 07 सप्टेंबर रोजी शहर पोलिस स्टेशन येथे कारवाई करण्यात आली. यामुळे डिजे धारकांचे चांगले धाबे दणाणले आहेत. शांतता व प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पारंपरिक वाद्यांना पसंती देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने अगोदरच शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्व मंडळांना केले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व नागरिकांनी डीजे च्या विरुध्द केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केल्याचे म्हटले आहे.