थोरातांच्या समर्थनार्थ संगमनेरात उसळला जनसागर घुलेवाडी येथील हरिनाम सप्ताहात कीर्तनकार संग्राम बापू मंडारे यांनी हिंदू धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे कीर्तन थांबवले. त्यानंतर महाराजांना धक्काबुक्की व गाडी फोडल्याचा बनाव करून ११ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर महाराजांनी थेट “बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसेप्रमाणे संपवू” अशी धमकी दिल्याने संगमनेरसह राज्यभर संताप उसळला.