आगामी ईद-ए-मिलाद-उन-नबी सणानिमित्त जुना आग्रहण परिसरासह शहरात विविध ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरील धोकादायक आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पक्षाच्या वतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.